शारंगधर अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटीचे शानदार उद्घाटन

808

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचे शिवसेना आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या शारंगधर अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटीचे दि.3 ऑगस्ट रोजी शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष म्हणून बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले की आर्थिक व्यवहार करताना भीड, भावना यांना कुठेही स्थान नको. सचोटीने सर्व व्यवहार करावे. काही पतसंस्था लवकर उभ्या राहिल्या व ताळमेळ नसल्याने लवकर बंद झाल्या. वास्तविक पतसंस्था या आपल्या भांडवलावर न चालवता लोकांचे डिपॉझिट घेऊन लोकांनाच कर्ज वाटायचे असते. तसेच प्रमाणिकपणा व ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या मार्गाने चालायचे असते. कोणीही गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नये. व्यवहार सांभाळून करावे. चांगला ठेवीदार, चांगला कर्जदार आपल्या पतसंस्थेत कसा येईल यासाठी प्रयत्न करा. जनतेचा विश्वास संपादन करून पतसंस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना, सर्व सामान्यांना मदतीचा हाथ द्या व एकजुटीने काम करून संस्थेची प्रगती करा’, असे आवाहन सुद्धा जाधव यांनी केले.

कोरोनामुळे निमंत्रण देता आले नाही – आमदार रायमुलकर

या कार्यक्रमाचे निमंत्रण मेहकर मतदारसंघातील सर्वच क्षेत्रातील मंडळींना द्यायचे होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे देता आले नाहीत. ही खंत सदैव राहील असे मत याप्रसंगी आमदार संजय रायमुलकर यांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या