शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य बाजीराव तांबे यांचा खून, 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एकाला अटक

2266

शेतरस्ता कामाचा राग व जुगार अड्ड्याची माहिती पोलिसाला दिल्याच्या संशयावरून शिवसेनेचे भूम पंचायत समिती सदस्य बाजीराव कल्याणराव तांबे यांची धारदार शस्त्र याने वार करून हत्या केली. भूम तालुक्यातील देवळाली येथे काल मंगळवार (26 मे) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी परंडा पोलिसात 12 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक झाली आहे. देवळाली येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून गावात तणावपुर्ण शांतात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली ते वंजारवाडी शेत रस्त्याच्या कारणावरून खुनातील आरोपी सोबत बाजीराव कल्याण तांबे यांचे 9 मे रोजी भांडण झाले होते. तसेच प्रकाश भागवत गोरे यांच्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड मारून कारवाई केली होती. या जुगार अड्डय़ाची माहिती बाजीराव यांनीच पोलिसांना दिली असा संशय यातील आरोपींनी घेतला होता. याचा राग मनात धरून चंद्रकात रावसाहेब तांबे, सुर्यकांत रावसाहेब तांबे, मधुकर रावसाहेब तांबे, रामनाथ चंद्रकांत तांबे, किरण भाऊसाहेब तांबे, प्रविण लिंगप्पा शेटे, अभिजित लिंगप्पा शेटे, श्रीपती भारत विधाते, प्रकाश भगवान गोरे, दिनकर ऊर्फ दिनेश गोरे, फकीरा गोरे, चंद्रकांत दिनानाथ शेटे (सर्व रा. देवळाली) यांनी संगनमत करून व पाळत ठेऊन बाजीराव तांबे हे मोटार सायकल वरून बार्शी येथे जाण्यासाठी निघाले असता ग्रामपंचायत कार्यालया समोरील रस्त्यावर त्यांची मोटार सायकल अडवून धारदार हत्याराने पोटात भोसकुन व हातावर वार करून हत्या केली. गंभीर जखमी बाजीराव तांबे यांना उपचारासाठी तातडीने बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यापुर्वीच त्यांचा मुत्यू झाला होता.

तीन घटनांत चार खून, नांदेड जिल्हा हादरला

घटनेची माहिती मिळताच भुमचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वरील 12 आरोपी विरुद्ध परंडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरिक्षक सय्यद हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या