आत्महत्या करू नका; उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

1065

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. या संकटाने खचून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. आत्महत्या हा काही पर्याय नाही, त्यामुळे तुमचे कुटुंब उघड्यावर पडणार आहे, कर्ज माफ होणार नाही, शेतकरी मर्द आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्याचा विचार करू नये, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना माजलगावमध्ये केले.

जनतेच्या आशीर्वादाने सरकार आले तर अगोदर शेतकरी कर्जमुक्त करणार! उद्धव ठाकरेंचा शब्द

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. काढणीला आलेल्या पिकांची पावसामुळे डोळ्यांसमोर नासाडी झाली. या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मराठवाड्यात आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी माजलगाव येथे रात्री अंधार असतानाही त्यांची भेट घेण्यासाठी थांबलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाने कोंब फुटलेले सोयाबीन व कापूस यांचे नुकसान मोठे झाले आहे. मेहनत करून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावुन घेतला असला तरी तुम्ही खचू नका,शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, तुम्हाला हेक्टरी 25 हजार रुपये मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना मदत करेल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, जयदत्त क्षीरसागर, जिल्हाप्रमुख सचिन मुळुक,अनिल जगताप,तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव, शहरप्रमुख पापा सोळंके उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या