आमची मैत्री पाहिली आता मशालीची धग आणि आग पाहा; उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वचनपूर्ती सभा जळगावात झाली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मिंध्यावर तोफ डागली. भाजपने शिवसेनेची मैत्री अनुभवली आहे, आता आमच्या मशालीची धग आणि आग अनुभवा, असा इशारा त्यांनी भाजपला दिला. आपल्यातील काही बेडून उड्या मारून दुसऱ्या पक्षात गेले. त्यांना जागा दाखवून द्यायची आहे. जनता आता जागी झाली आहे, त्यामुळे 2024 मध्ये देशात भाजपचे सरकार राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच ही जनता गद्दारांना त्यांच्याच खोक्यात गाडून टाकेल, असेही ते म्हणाले.

निवडणुका आलेल्या नाही, त्यावेळी प्रचारासाठी सभा घ्यावा लागतात. आताची दुपारची वेळ आहे. ही सभेची वेळ नाही. तसेच काही विशेष निमत्तही नाही. पुतळ्याचे अनारण झालेले आहे. तरीही तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि उत्साहाने आलात, ही महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक कार्यक्रम होतात, पण त्यासाठी भाड्याने माणसे आणावी लागतात. भाडे मिळाले, त्यांचा वेळ झाला की माणसे उठून निघून जातात. असा टोलाही त्यांनी लगावला. कोण बोलतंय, काय बोलतय, कशावर बोलतोय, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात., अशी परिस्थिती असते.

काही दिवसांपूर्वी आपण पाचोऱ्याला आलो होतो. त्यावेळी आपण घाईत होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आपल्याहस्ते भूमीपूजन करण्यात आले होते. हा पुतळा उभा राहिल, त्यावेळी अनावरण सोहळ्याला आपण नक्की येऊ, असे वचन आपण दिले होते. आपण वचन दिले की, विसरत नाही. एकदा शब्द दिला तर तो पाळायचाच, ही शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहोब यांची शिकवण आहे. शब्द देताना एकदा, दोनदा नाही तर लाखवेळा विचार कर, पण एकदा शब्द दिला की, प्राण गेला तरी बेहत्तर, शब्द पडू द्यायचा नाही, ही त्यांची शिकवण आहे. या सभेचे नावचवचनपूर्ती सभा आहे.

एक काळ असा होता की, जळगावने प्रगतीचा वेग पकडला होता.त्यावेळी जनतेनेही शिवसेना-भाजपकडून उमेदवार कोण याचा विचार न करता आमच्यासाठी मतदान केले. पण काही माणसे मोठी झाली, डोक्यात हवा गेली आणि हे गॅसचे फुगे तरंगायला लागले. आम्ही म्हणजे सर्वकाही असे त्यांना वाटत आहे. आताया फुग्यांना टाचणी मारायचे काम तुम्हांला करायचे आहे. ही कोणी मोठी माणसे नाहीत, तुम्ही ताकद देत त्यांना मोठे केले आहे. त्यामुळे प्रगतीचा वेग थांबला होता. आता तरुण पिढी उभी राहते आणि जळगावला पुन्हा प्रगतीपथावर नेण्याचे काम ते करत आहेत. त्याचा आपल्याला अभिमान आहे. आता कोण आडवे येतेय, येऊ दे.

चार टकले आहेत, त्यांच्याकडे फक्त फक्त रिकामा खोका आहे. मेंदू, बुद्धी वैगरे काही नाही. आज दोन महापुरषांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यातील एक सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. आपण त्यांना लोहपुरुष, पोलादीपुरुष म्हणून ओळखतो. हा आपला कार्यक्रम आहे. सरकारी कार्यक्रमात राजकीय बोलू नये, असे संकेत असतात. हे आपले मैदान आहे. आपला कार्यक्रम आहे. गुजरातमध्ये वल्लभभआई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला. हे जे काय सुरू आहे, ते लक्षात घ्या. आजपर्यंत भाजप किंवा त्यांच्या मातृसंस्थेने आदर्श अशी व्यक्तीमत्त्वे घडवलीच नाहीत. मग त्यांनी फक्त चोरीचे काम केले. सरदार वल्लभभाई आहेत, घ्या चोरून, नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत, घ्या चोरून.आता तर माझे वडील चोरायला निघाले आहेत. स्वातंत्र्यलढ्याशी तुसराम संबंध नसलेले आज अनेक महापुरुष हे आमचे, ते आमचे असे करत स्वतःची दहीहंडी उभी करत आहेत. मात्र, त्यांच्याकडे काहीच कर्तृत्व नाही.

सरदार वल्लभभाई यांचा उंच पुतळा त्यांनी उभारला. 300 फूट, 500 फूट अगदी हजार फूटांची जरी उभआरला. तरी त्यांच्या कर्तृत्वाच्या आणि कामांच्या जवळपासही हे फिरकू शकत नाहीत. यांच्यात कसेल पोलादी पुरुष. आता 17 तारखेला मराठवाडा मुक्तीदिन आहे. काही मोठे लोक आयते लोणी खायला येणार आहेत. जणूकाही आम्हीच सर्वकाही केले. आमचा हा मंडप आणि त्यांचा मंडप याचा खर्च काढा, कोणच्या खिशात ते पैसे घालतात, याचाही हिशोब काढा. लूटालूट करून सर्वत्र आदेर्श म्हणून मिरवायाचे, हे यांचे चाळे सुरू आहेत.

ज्या वल्लभभाई पटेल यांनी मराठवाडा मुक्त केला. निजाम, रझाकारांविरोधात फौजा घुसवल्या. लष्करी करावाई केली. हिंदूंवर अत्याचाक करणाऱ्यांना हुसकावून लावले. म्हणूनच त्यांना पोलादीपुरुष, लोहपुरुष म्हणतात. हे फक्त नावाचे लोहपुरुष हे खरे तर तकलादू पुरुष आहेत. मणीपूरमध्ये काय सुरू आहे, आपल्यापर्यंत बातम्याही येत नाहीत. महिलांची खुलेआम विटंबना झाली. त्यावर कोणीच काही बोलायला तयार नाही. देशाचे पंतप्रधान जी 20 मध्ये लगबग करत आहेत. आमचे मुख्यमंत्रीही तिथे गेले आहेत. मुळात ते बेकायदा मुख्यमंत्री आहेत, हे न्यायालयाचे म्हणणे आहे. गद्दार आहेत. तेही तिथे गेलेत. ते कोणाशी बोलणार, बायडेनशी ते बोलणार, ऋषी सुनकसोबत फोटो, फोटो कसले काढताय, काय बोललात ते सांगा आणि कोणत्या भाषेत बोललात, तेपण सांगा. ते काय बोलले, ते तुम्हाला कळले काय, तुम्ही बोलला ते त्यांना कळले काय. ते काही नाही. फोटो आला पाहिजे. चमकोगिरी करायची आहे त्यांना फक्त.

मणीपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले, त्याबाबत पंतप्रधान एक शब्दही बोलायला तयार नाहीत. केंद्रीय गृहमंत्री तेथे जाऊन आले. पण काहीही कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचीखणानारळाने ओटी भरून तिला परत पाठवणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महिलांचा सन्मान करणाऱ्या महाराष्ट्रात महिलांची अपमान करणारा मंत्री आहे. मणीपूरमध्ये जे झाले, त्यावर तुमचे बापजादे बोलायला तयार नाहीत. कारवाईदेखील काहीही केलेली नाही. त्यामुळे या महापुरुषांचे नाव घेण्याचा आणि पुतळा उभारण्याचा अधिकार त्यांना नाही.

आपण मुख्यमंत्री असताना एका मंत्र्यांवर आरोप झाल्यावर राजीनामा घेत, त्याला चौकशीला सामोरे जायला लावले होते. जर मी राजीनामा घेतला नसता, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुखांना तोंड दाखवायच्या लायकीचे आपण राहिलो नसतो. सध्या राज्यात काय सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचे आणि गंभीर आरोप असणाऱ्यांना मंत्रई म्हणून कायम ठेवायचे. हे आपण सहन करू शकत नाही. सत्ता आली काय गेली काय, आशिर्वाद देणारे तुम्ही आहात. आपण सत्तेसाठी हे करत नाही. देशाचे नेतृत्व खूप मोठी गोष्ट आहे ती. आपल्याला अशी वेडीवाकडी स्वप्ने पडत नाहीत. माझा जीव देशासाठी आणि तुमच्यासाठी जळतोय. जनतेला जागे करण्याचे काम वंशपरंपरागत होय, घराणेशाहीने आले आहे. तेच काम आपण करत आहोत.

इंडिया आघाडीची बैठक झाली. त्याचे अध्यक्षपद आपल्याकडे होते. देशातील अनेक मोठे नेते बैठकीसाठी आले होते. आपला पक्ष आणि चिन्ह त्यांनी चोरले होते. आपल्याकडे काय आहे. असे असूनही त्या आघाडीत आपल्याला किंमत आहे, ते तुमच्यामुळेच आहे. त्या बैठकीनंतर गद्दारांनी आणि गद्दारी करायला लावलेल्यांनी शिवसेनाप्रमुखांचे होर्डिंग्ज लावत मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असे लिहीले होते. बरोबर आहे, शिवसेनेची काँग्रेस कदापी होणार नाही. 25,30 वर्षे एकत्र असूनही शिवसेनेची जशी भाजप झाली नाही, तशी काँग्रेससोबत असताना शिवसेनेची काँग्रेस होणार नाही. त्याला प्रत्युत्तर देत आपणही होर्डिंग्ज लावले, मी शिवसेनेला कमळाबाईची पालखी वाहायला देणार नाही. होय, त्यांना आपण कमळाबाई म्हणतोय, ते घराणेशाही म्हणतात ना, मग घराणेशाहीचे गुण दाखवायला हवेत. कमळाबाई हा शब्द कोणाचा माझा की शिवसेनाप्रमुखांचा….तो मी वापरला तर गुन्हा आहे काय…असा जबरदस्त टोलाही त्यांनी लगावला. अजूनही शिवसेना तीच आहे, हे दाखवण्यासाठी आपण त्यांना कमळाबाई म्हणतोय आणि यापुढेही कामळाबाईच म्हणणार.

देशाचा नेता कोण होईल, हे नंतर ठरवूया. आधी देशाचा नागरिक कसा असावा, हे तुम्हाला ठरवावे लागणार आहे. मी माझ्या देशाचा भारताचा नागिरक आहे. आता देशाचा नागरिक कसा आसावा, हे ठरवण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. देशाचा नागरिक स्वातंत्र्यप्रेमी, स्वाभिमानी, अभिमानी होणार की भाजपचा गुलाम होणार, हे तुम्हांला ठरवायचे आहे. म्हणून देशका नेता ही घोषणा नको, देशचा नागरिक कैसा हो, छत्रपती शिवराय यांच्या मावळ्यासारखा नागरिक होवो, अशी आपली घोषणा पाहिजे. आम्ही गुलाम होणार नाही आणि कोणी गुलाम करण्याचा प्रयत्न केला तर त्याला तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. तरच आम्ही छत्रपती शिवराय यांचे मावळे आहोत.

राजकारण किती खालच्या स्तरावर गेले आहे. सरदार वल्लभभाई यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना स्टेज थोडे हलत होते. आपण म्हणालो हे केंद्र सरकारचे प्रतीक आहे. केंद्र सरकार आता हलायला लागले आहे. ते आता घाबरले आहेत. त्यांना वाचत होते, आपल्याला आव्हानच नाही. समोर ही नागरिकांची ताकद आहे. सर्व देशप्रेमी पक्ष एकत्र झाले आणि इंडिया आघाडी स्थापन झाली. त्यावर त्यांना एवढी खाज सुटली की, सत्तेची खाज वेगळी..त्यांना सत्तेची हाव आणि खाज सुटली आहे..नको तेवढी आणि नको तिकडे सुटली आहे. मग हा पक्ष फोड, तो पक्ष फोड का…तर यांना खाज आली आहे. खाज आली तर पक्ष फोडायचे नसतात, खाजवायचे असते, खाजवा ना तमुचे तुम्ही…

आता जनता जागी झाली आहे. आग्यामोहोळ उठले आहे. यांचा दंश आता त्यांना परवडणार नाही. त्यांना एवढी खाज आली की त्यांनी इंडियाचे भारत केले. एवढे ते घाबरले आहेत. आम्ही इंडिया नाव घेतले. त्यात आम्ही काय म्हटलेय, जुडेगा भारत, जीतेगा इंडिया. भारत पण आमचाच आहे, इंडियापण आमचाच आहे आणि हिंदुस्थानपण आमचाच आहे. आधी आमची तुलना अतिरेक्यांशी केली…इंडियन मुजाहिद्दीन…आणि आता देशाचे भारत केले. नशीब भारत तरी म्हणत आहे. नाहीतर देशालाही त्यांचेच नाव दिले असते. देशात आपणच जन्माला आलो, त्यानंतरच सर्व आले, असा त्यांचा समज झाला आहे.

त्यांनी देशाचे नाव बदलले, आम्हीही बदल करणार आहोत, आम्ही देशातील सत्ताधारी पक्ष बदलणार आहोत. आम्ही पंतप्रधान बदलणार आहोत. 10 वर्षे झाली ते सत्तेत आहेत. आपण तुम्हाला कार्यक्रम दिला आहे. होऊन जाऊ दे..चर्चा.. परवा आपण नगरमध्ये गेलो होतो. पावसाअभावी पिके करपून गेली आहेत. वीज नियमती मिळत नाही, वीजेचे बिल नियमित मिळते. हे फक्त इंजिनामागून इंजिने लावत आहेत पण कारभार शून्य.

आपण नगरमध्ये गेल्यावर लोकांनी स्वागत केले. आपण सांगितले तुम्ही संकंटात आहात, जेव्हा तुम्ही आनंदात असाल, आनंदी आनंद असेल, त्यावेळी तुमच्यासोबत उत्सव साजरा करण्यासाठी येईन. आता ओवाळण्या, स्वागत वैगरे करू नका, असे आपण त्यांना सांगितले. माझ्यासाठी एका मुलाने शिदोरी आणली होती. तो जेवला नसेल, पण त्याच्यासाठी आईने दिलेली चटणी, भाकरी, कांदा ही शिदोरी त्याने माझ्यासाठी आणली होती. माझ्याकडे पद नाही, काही नाही, तरीही जनतेचे आपल्यावर प्रेम आहे. आताही लहाने मुले माझी चित्रे घेऊन रस्त्यात उभी होती. ही प्रेमाची कमाई आहे. तुम्ही मला कुटुंबातील एक मानता, असा कोणता नेता असेल, ज्याला तुम्ही कुटुंबातलेच एक मानता. राजकारण्यांपासून सगळे दोन हात लांब रहातात. मला जनतेच हे प्रमे मिळत आहे, हीच खरी कमाई आहे.

मोदी, शहापासून सगळे येतात. त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरे असतोय. संपवले ना त्यांनी उद्धव ठाकरेला मग त्यांच्या भाषणात का विषय असतो माझा. उद्धव ठाकरे एकटा नाही, त्याच्यासोबत शिवसेनाप्रमुखांचे हे तेजाचे वारसदार आहेत. हा केवळ माझ्यावरचा नाही, तुमच्यावरचाही हल्ला आहे. आज ते सर्व महाराष्ट्र लूटून फस्त करत आहेत. मुख्यमंत्र्यांना दिल्ली जाऊन जी 20 ची सरबराई करायला वेळ आहे पण जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत, त्यांना भेटायला वेळ नाही. त्यांच्याशी निदान बोला तरी, काय मागण्या आहेत, ते तर समजून घ्या. तिथे निघृणपणे लाठीमार करण्यात आला. पोलीसही माणसे आहेत. कोरोना काळात त्यांनी जीव धोक्यात घालून सेवा बजावली आहे. पोलीस स्वतःच्या मनाने शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात एवढा मोठा ताफा घुसवू शकतात का, अश्रूधूराचा मारा करू शकतात का, हवेत गोळीबार करू शकता का, हे करणारा कोणीतरी जालनावाला उपटला आहे. यामागे कोण आहे, ते तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कोण टरबूजा म्हणाला का, मला असा माणूस माहिती नाही. तुम्ही म्हणताय म्हणून असा टरबूजासारखा माणूस मी बघेन. तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा.

महाराष्ट्रात राक्षसी वृत्ती आली कोठून. कश्मीरमध्ये अतिरेक्याविरोधात वापरायच्या बंदूका, नागरिकांविरोधात वापरल्या जात आहेत. हे एवढे निघृण सरकार हिंदुत्ववादी असूनच शकत नाही. त्यांचा हिंदुत्ववाद थोतांड आहे. हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. तुम्ही आमचे हिंदुत्व स्विकारले म्हणून आपण भाजपला सोडले, पण हिंदुत्व सोडले नाही, सोडू शकत नाही. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीते पैसे अद्यापपर्यंत मिळाले नाहीत.

युतीचे वैभवशाली दिवस होते. सर्व दिग्गज नेते होते. आता टरबूजाने सर्व भाजप संपवून टाकले. उपऱ्यांना निष्ठांवंतावर बसवले आहे. अयोध्येत राममंदिर झाले, तसे महाराष्ट्रात आयारम मंदिर बांधत आहेत. शिवसेनाप्रमुखांनी त्यांना हिंदुत्वाची दिशा दाखवली नसती ,तर ते देशाच्या राजकारणात तळागाळात गेल असते. गर्व से कहो हम हिंदू है हा नारा शिवसेनाप्रमुखांनी बुलंद केला म्हणून त्यांना सत्ता मिळाली आहे. तुम्ही देश सांभाळा आम्ही महाराष्ट्र सांभाळतो, हे शिवसेनाप्रमुखांनी त्यांना सांगितले होते. पण त्यांना देश पाहिजे, महाराष्ट्र पाहिजे, मुंबई पाहिजे, जळगाव पाहिजे, बाजार समित्या पाहिजे. दिसेल तिथे घुसेन ही त्यांची वृत्ती आहे. तुम्ही शिवसेनेच्या नरडीला हात लावला, तेव्हा ठरवले की त्यांचा महाराष्ट्रातून निःपात केल्याशिवाय राहयचे नाही. आतापर्यंत तुम्ही आमची दोस्ती अनुभवली आता राज्यभर पसरलेली मशालीची धग आणि आग अनुभवा. 2024 मध्ये हे सरकार देशात राहणार नाही म्हणजे नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.