शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी सभा

117

सामना प्रतिनिधी । जालना

घनसावंगी येथे शिवसेनेच्या वतीने रविवारी दुपारी १२ वाजता भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत.

हा मेळावा घनसावंगी येथील विजय राजे देशमुख क्रिकेट मैदानावर ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. शेतकऱ्यांना न मिळालेली कर्जमाफी, बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, शेतमालाच्या ढासळलेल्या किमती, विजेचा लपंडाव या पाश्र्वभूमीवर हा शेतकरी मेळावा होत असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असल्याचे शिवसेना सहसंपर्कप्रमुख अ‍ॅड. हिकमत उढाण यांनी सांगितले.

या मेळाव्याचे आयोजक शिवसेना संपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, परभणीचे खासदार संजय जाधव, सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, यावेळी जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, युवा सेनेचे जगन्नाथ काकडे, माजी उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब पाऊलबुद्धे, शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा संघटक अ‍ॅड. भास्कर मगरे, महिला आघाडीच्या सविता किंवडे यांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक, विविध आघाड्यांचे पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण व तालुकाप्रमुख उद्धव मरकड, हरिभाऊ पोहेकर, संतोष मोहिते, पंकज सोळंके यांनी केले आहे.

सभास्थळाची पाहणी
शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य जाहीर सभा होणाऱ्या स्थळाच्या तयारीचा आढावा घेतला. सभास्थळ, व्यासपीठ, बैठक व्यवस्था, पार्किंग आदींबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण, माजी आमदार संतोष सांबरे, तालुकाप्रमुख उद्धव मरकड, बापूसाहेब देशमुख, श्याम उढाण, शहरप्रमुख अशोक शिलारे, विनोद चव्हाण, दत्तात्रय बेंद्रे, राज घोगरे, अनिल सानप आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या