स्थायी समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे राजू वैद्य यांचा दणदणीत विजय

127

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रेणुकादास ऊर्फ राजू वैद्य यांचा एकतर्फी विजय झाला. एमआयएमच्या उमेदवारांसह नगरसेवक मतदान प्रक्रियेला गैरहजर राहिले. त्यामुळे वैद्य यांनी युतीच्या नगरसेवकांची ११ मते घेऊन दणदणीत विजय मिळवला. सभापतीपदी राजू वैद्य जिंकून येताच घोषणाबाजी, ढोल-ताशे आणि फटाक्यांच्या आतषबाजीने मनपाचा परिसर दणाणून गेला. शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत सभापतीपदाचा पदभार स्वीकारला.

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी आज सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. शिवसेना-भाजप युतीचे राजू वैद्य आणि एमआयएमच्या शेख नर्गिंस शेख सलीम हे दोन उमेदवार रिंगणात होते. युतीचे राजू वैद्य यांच्यासह शिल्पाराणी वाडकर, ऋषिकेश खैरे सिध्दांत सिरसाट, स्वाती नागरे, रूपचंद वाघमारे, भाजपचे पूनम बमने, जयश्री कुलकर्णी, राखी देसरडा, शहरविकास आघाडीचे गजानन बारवाल, सत्यभामा शिंदे हे अकरा नगरसेवक भगवे फेटे बांधून स्थायी समितीच्या सभागृहात दाखल झाले. त्यापाठोपाठ काँग्रेसचे अब्दुल नवीद अब्दुल रशीद हे सभागृहात गेले. पीठासीन अधिकारी उदय चौधरी यांनी निवडणूक प्रक्रिया सूरू केली. नगरसेवकांच्या रजिष्टरमध्ये स्वाक्षरी घेऊन हात वर करून मतदान घेण्यात आले. राजू वैद्य यांना ११ मते मिळाली. मतदान प्रक्रिया पूर्ण होताच एमआयएमच्या उमेदवारांसह तीन नगरसेवक सभागृहात दाखल झाले. परंतु निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे हे सदस्य गैरहजर असल्याची नोंद करण्यात आली. काँग्रेसचे नगरसेवक तटस्थ राहिले. पीठासीन अधिकारी उदय चौधरी यांनी राजू वैद्य हे ११ विरुद्ध शून्य मतांनी विजय झाल्याचे घोषित करून प्रमाणपत्र दिले.

घोषणाबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी

स्थायी समितीच्या सभागृहातून शिवसेना-भाजप युतीचे नगरसेवक आनंदात बाहेर पडताच कार्यकत्र्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘शिवसेना-भाजप युतीचा विजय असो’, ‘शिवसेना जिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मनपा समोर ढोल-ताशांचा दणदणाट आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भगवेध्वज घेऊन कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करीत होते.

सभापतीपदाचा पदभार वैद्य यांनी स्वीकारला

शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह सर्व पदाधिकारी सभापतींच्या दालनात दाखल झाले. राजू वैद्य यांच्यासह युतीचे नगरसेवक दालनात दाखल होताच घोषणाबाजीने दालन दणाणून गेले. राजू वैद्य यांना सभापतींच्या आसनावर बसविण्यात आले. त्यानंतर शिवसेना नेते खासदार खैरे, संपर्कप्रमुख घोसाळकर, महापौर घोडेले, जिल्हाप्रमुख दानवे उपमहापौर विजय औताडे यांनी वैद्य यांचा भव्य पुष्पहार घातला. सभापतीपदाचा पदभार वैद्य यांनी स्वीकारला. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी वैद्य यांचे स्वागत केले. महापौर घोडेले यांच्या दालनात नवनिर्वाचित सभापती राजू वैद्य यांचा महापौरांनी सत्कार केला. यावेळी महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, सभागृह नेता विकास जैन, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, शहरप्रमुख विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, संतोष जेजूरकर, आनंद तांदुळवाडीकर, पृथ्वीराज पवार, मनपा गटनेते मकरंद कुलकर्णी, नगरसेवक मोहन मेघावाले, गजानन मनगटे, आत्माराम पवार, कमलाकर जगताप, मनोज गांगवे, मनोज बल्लाळ, नितीन साळवी, बन्सी जाधव, सीताराम सुरे, सुमित्रा हळनोर, आशा भालेराव, माजी उपमहापौर स्मीता घोगरे, मीना गायके, सुरेखा सानप, सीमा चक्रनारायण, शिल्पा वाडकर, स्वाती नागरे, ऋषिकेश खैरे, सिध्दांत सिरसाट, महिला आघाडीच्या सहसंपर्वâ संघटक सुनीता आऊलवार, किशोर नागरे, दिग्वीजय शेरखाने, सुर्यकांत जायभाय, विरभद्र गादगे, हिंम्मत पटेल, साहेबराव घोडके, जयसिंग होलिये, गणेश अंबिलवादे, प्रशांत डिघोळे, रवि कदम, कान्हू चक्रनारायण, रामदास गायके, विशाल गायके, संतोष खेंडके, ज्ञानेश्वर डांगे, अनिल मुळे, जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी, भाजपचे गटनेता प्रमोद राठोड, राज वानखेडे, शिवाजी दांडगे, नितीन चित्ते, पूनम बमने, दिलीप थोरात, गजानन बारवाल, दामुअण्णा शिंदे, अ‍ॅड. माधुरी अदवंत, मनीषा मुंढे, जयश्री कुलकर्णी, राखी देसरडा, प्रशांत देसरडा, सुरेंद्र कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षण सभापती मनोज बल्लाळ, आरोग्य सभापती मीना गायके

स्थायी समितीच्या सभागृहात सभापतीपदाची निवडणूक झाल्यानंतर पाच विषय समितींच्या सभापतीपदाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. विषय समितींच्या सभापतीपदासाठी उमेदवाराचा एक अर्ज दाखल झाल्यामुळे उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी उदय चौधरी यांनी जाहीर केले. माध्यमिक पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समितीच्या सभापतीपदी मनोज बल्लाळ आणि वैद्यकीय सहायक व आरोग्य समितीच्या सभापतीपदी मीना रामदास गायके यांची निवड झाली. तसेच महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अ‍ॅड. माधुरी देशमुख, उपसभापतीपदी सुरेखा बाळासाहेब सानप, शहर सुधार समितीच्या सभापतीपदी शोभा नारायण वळसे, गलिच्छ वस्ती निर्मूलन, घर बांधणी व समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी विमल गोविंद केंद्रे यांची निवड झाली. महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, नगर सचिव दिलीप सूर्यवंशी, कैलास नवले, सोहेल खान, श्याम उदावंत, मुक्ता म्हस्के, एस.पी. पवार, लेखाधिकारी संजय पवार, उदय मोकाशी, रजा अली, वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, अ‍ॅड. अपर्णा थेटे यांनी सहकार्य केले.

आपली प्रतिक्रिया द्या