घारापुरी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

72

सामना प्रतिनिधी । उरण

घारापुरी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. याआधीच झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उपविभाग प्रमुख बळीराम ठाकूर विजयी झाले होते. बळीराम ठाकूर यांनी रविवारी सरपंचपदाची सूत्रे हाती घेतली. तर उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सेनेचे सचिन म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली.

घारापुरी ग्रामपंचायतीची निवडणुक महिनाभरापूर्वी पार पडली. या निवडणुकीत सेनेचे उपविभाग प्रमुख बळीराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सरपंचासह ७ पैकी ६ जागा पटकावून घारापुरी ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. रविवारी पार पडलेल्या उपसरपंचाच्या निवडणुकीतही सेनेने बाजी मारली. सेनेचे शाखा प्रमुख सचिन म्हात्रे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी ग्रा.प.सदस्य मंगेश आवटे, भरत पाटील, सदस्या ज्योती कोळी, मीना भोईर, सुभद्रा शेवेकर आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या