शिरोळमध्ये महागाईविरोधात शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा

17

सामना प्रतिनिधी । शिरोळ

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस दरात भरमसाठ वाढ केल्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईची अधिक झळ पोहचत आहे. महागाईवर नियंत्रण मिळवत ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले.

शिरोळ पंचायत समितीच्या आवारातून मोर्चाची सुरवात झाली. आपल्या मागण्याबाबत घोषणा देत मोर्चा तहसीलदार कार्यालयावर आला या ठिकाणी तहसीलदार गजानन गुरव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात तबल तेरा वेळा पेट्रोल डिझेल व घरगुती गॅसचे दरात वाढ केली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे.

shirol-sena

‘अच्छे दिन’ या घोषनेद्वारे केंद्र व राज्य शासनाने सामन्यांना भुलवण्याचे काम सुरू केले आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे दर वाढत आहे. ते त्वरित कमी करावे. नोटबंदी, जी.एस.टी यामुळे समाजातील सर्व स्थरातील नागरिकांवर मोठा अन्याय झाला आहे. शेतकऱ्यांसाठी तर शासन काहीच करत नाही असा आरोपही निवेदनात केला आहे. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, तालुका प्रमुख सतीश मलमे यांनी केले. या मोर्चामध्ये जिल्हा परिषद संदस्यां स्वाती सासणे, शिरोळ पंचायत समिती उपसभापती कविता चौगुले, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, पंचायत समिती सदस्य संजय माने, बाळासो कोकणे महिला जिल्हा संघटिका मंगल चव्हाण, रेखा जाधव, प्रतीक धनवडे, राजू आवळे, अरुण होगले, जुगल गावडे, अप्पा भोसले, सुरज भोसले आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या