कोल्हापुरात भारनियमनाविरोधात शिवसेनेची तीव्र निदर्शनं

47

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

राज्यभरात ऐन सणासुदीच्या काळात सुरू करण्यात आलेल्या भारनियमनामुळे नागरिक त्रस्त आहे. ऑक्टोबर हिटचा तडाखा आणि भारनियमन यामुळे सामान्य नागरिकाची हालत शॉक लागल्यासारखी झाली आहे. याच भारनियमनाविरोधात शनिवारी जिल्हा शिवसेनेच्यावतीने महावितरण कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली.

समाधानकारक पाऊस आणि सर्वत्र मुबलक पाणीसाठी असतानाही कोसळा तुटवड्याचे कारण पुढे करत भारनियमनाचा ‘भार’ नागरिकांच्या माथ्यावर मारला जात आहे. सरकार निवडणुकीसाठी पैशांचा पुरवठा करणाऱ्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे षडयंत्र करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सरकारच्या निषेधार्थ मुख्यअभियंत्याला कोळशाची पाटी देण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव यांच्यासह असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

kolhapur-sena

आपली प्रतिक्रिया द्या