विधिमंडळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र

हिंदुहृदयसम्राट   शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या 23 जानेवारीला मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांचे तैलचित्र लावण्यात येणार असल्याची  घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान भवनच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याची मागणी केली होती.  त्यावर पुढील तीन महिन्यांत हे तैलचित्र लावण्याचे काम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन राहुल नार्वेकर यांनी दिले होते. त्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यासाठी त्यांच्या जयंतीची तारीख निश्चित करण्यात आली असून त्याची माहिती राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे नाव जोडण्याची सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी केली.