राज्य सरकार विरोधात शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण, नोकरदारांच्या विविध मागण्यासाठी रेकॉर्ड तोड असा विक्रमी परिवर्तन मोर्चा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदीचे कार्यकर्ते सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात मेहकर येथील तहसिलवर धडकला.
शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, सोयाबीनला 8 हजार, कपाशी व तुरीला 12 हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, अतिवृष्टीमुळे सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाल्यामुळे प्रतिएकर 24 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, मेहकर शहरातील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावावा, बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात यावी, शेतकर्यांच्या पीकविमा तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करावा, शेतीला दिवसा 12 तास वीजपुरवठा देण्यात यावा, घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा, जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या लोणार विकास आराखड्याची रखडलेली कामे पूर्ण करावी, महिलांना सुरक्षा देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यात यावे, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून न्याय देण्यात यावा, घरकूल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना तत्काळ लाभ देण्यात यावा, जागतीक पर्यटन स्थळ लोणार विकास आराखड्याची रखडलेली कामे त्वरीत पुर्ण करावी, मेहकर लोणार तालुक्यातील शेतरस्ते तात्काळ तयार करुन देण्यात यावे, स्मशान, दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करुन द्याव्या, कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत नियमित करावे, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागण्यासाठी हा मोर्चा जानेफळ रोड वरील शिवसेना कार्यालयापासून निघून तहसिलवर धडकला. यावेळी या मोर्चात शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, शहरप्रमुख किशोर गारोळे, जिल्हा संघटक गोपाल बछिरे, दिलीप वाघ, अॅड. सुमित सरदार, माजी नगराध्यक्ष अशोक अडेलकर, अॅड. आकाश घोडे, ऋषिकेश जगताप, संदीप गवई, शुभम वानखेडे, अमोल मोरे, दीपक मापारी, संजीवनी वाघ, गजानन जाधव, निंबाजी पांडव, श्रीकांत मादनकर, बद्री बोडखे, यासह शिवसेना महिला आघाडी, युवासेना, पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी निष्क्रीय शासनाचा आपल्या भाषणातून समाचार घेवून गद्दारांना धडा शिकवून मेहकर मतदार संघावर भगवा फडकवा असे आवाहन मोर्चेकर्यांना केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी सुद्धा शासनाचा गद्दार आमदार खासदारांचा आपल्या भाषणातून समाचार घेत शेतकरी कष्टकरी बेरोजगार यांचे प्रश्न मांडून आता हे प्रश्न सोडविण्यासाठी आपले उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन केले. मेहकरचा आजचा मोर्चा रेकॉर्ड तोड व विक्रमी झाला. गद्दारांच्या व शासनाच्या विरोधात चीड निर्माण करणारा ठरला.