‘गणराया यांना सुबुद्धी दे रे बाबा’ म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांवर तोफ डागली. 1800 स्क्वेअर फूट जागेतून महाराष्ट्र इंस्टिटय़ुट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन अर्थात ‘मित्रा’चं कार्यालय चालवत होते तेव्हा महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला पळवले. आता महिन्याला 21 लाख रुपये खर्चून, 8 हजार स्क्वेअर फुटांचे कार्यालय देऊन काय दिवे लावणार? मलबार हिलवर बसून थेट मुंबईचाच सौदा करणार काय?, आपल्या ‘मित्रा’साठी मुख्यमंत्री कितीही खर्च करू शकतात. पण जनतेच्या खिशातून का?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत मराठी माणसा जागा रहा, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.