स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाज संघटित करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले- संभाजी कदम

‘100 दिवस शेळी होवून जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा’ असा संदेश देत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जीवन कसे जगायचे हे त्या काळी सांगितले होते. अशा महान व्यक्तीमत्वाचे विचार हे आपणास नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. वि.दा. सावरकरांचे विज्ञानवादी विचार आणि देशप्रेम आपल्यामध्ये नेहमीच उत्साह आणि देशप्रेम जागवतात. सर्व समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी आपले जीवन अर्पण केले. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा नेहमीच अंगिकार करुन काम केले आहे, असे प्रतिपादन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, दत्ता कावरे, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, संग्राम कोतकर, रवी वाकळे, संदिप दातरंगे, अरुण झेंडे, संतोष शिंदे, गडाख पाटील आदि उपस्थित होते.