गारपीटग्रस्तांना एकरी पन्नास हजारांची मदत करा; माळशिरस शिवसेनेची मागणी

अवकाळीग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱयांना तत्काळ एकरी 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन माळशिरसचे तहसीलदार तुषार देशमुख यांना देण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष राऊत, तालुका युवा अधिकारी गणेश इंगळे, उपतालुका युवा अधिकारी दुर्वा अडके, डॉ. नीलेश कांबळे, दत्ता साळुंखे, शेखर खिलारे, अनिल बनपट्टे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, माळशिरस तालुक्यात गारपीट, अवकाळी पावसाने शेतमालाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पिकांसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, या चिंतेत शेतकरी पडलेला आहे. शेतकऱयांना अजूनही आधीचे अनुदान मिळालेले नसताना गारपीट व अवकाळी पावसाचे संकट शेतकऱयांपुढे उभे राहिले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱयांना तत्काळ एकरी 50 हजारांची मदत करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.