शिवसेनेने उत्तर प्रदेशमध्ये खाते उघडले

सामना ऑनलाईन । अलाहाबाद

शिवसेनेचा भगवा उत्तर प्रदेशमध्ये फडकला आहे. स्थानिकांना इतर पक्षांपेक्षा शिवसेना हाच सर्वाधिक विश्वासार्ह पक्ष वाटल्यामुळे शिवसेना उमेदवाराचा उत्तर प्रदेशमध्ये विजय झाला आहे. अलाहाबादच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ४० मधून शिवसेना उमेदवार दीपेश यादव यांचा दणदणीत विजय झाला आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करुन शिवसेना उमेदवाराच्या विजयाची माहिती दिली आणि मतदारांचे आभार मानले. ‘काम करेंगे, दिल जीतेंगे!!! करून दाखवलं! करून दाखवणार! ही एक सुरवात आहे!’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या