शिवसेना-युवासेनेच्या वतीने मेहकरात सिंधुताई जाधव कोविड केअर सेंटर सुरू

शिवसेना व युवासेनेच्या वतीने आज शहरात श्रीमती सिंधुताई जाधव कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आप आपल्या विभागात कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांना दिलासा द्यावा असे आवाहन शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे.

100 बेडच्या सर्व सुविधायुक्त या कोविड सेंटरचे आज खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्घाटन केले. यावेळी खासदार जाधव पुढे म्हणाले की जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रत्येक विभागात कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांना सेवा व हिंमत द्यावी. मेहकर मधील या कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना सर्व सुविधा, वायफाय, योगा शिकवला जाणार आहे. जेवणाची व काढ्याची सोय केली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 24 तास कोविड परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे ही अभिनंदनाची बाब आहे. आमदार संजय रायमुलकर यावेळी म्हणाले की, मेहकर, लोणार, हिवरा आश्रम येथे कोविड केअर सेंटरला 100-100 गाद्या आपण दिल्या. तसेच रुग्णांना ड्रायफुड, नाष्टा चांगल्या दर्जाचा दिला जाईल. सर्व कोवीड केअर सेंटर मध्ये रुग्णांची गैरसोय होणार नाही.

यावेळी बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, प्रा.बळीराम मापारी, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस शाम उमाळकर, सभापती माधवराव जाधव, गटनेते संजय जाधव, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळुकर, रा.काँ.चे जिल्हा पदाधिकारी गिरीधर पाटील, शारंगधर अर्बनचे संचालक निरज रायमुलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, तहसीलदार डॉ. संजय गरकळ, वैद्यकीय अधिक्षक शाम ठोंबरे, तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र सरपाते, न.प. मुख्याधिकारी सचिन गाडे, कार्यकारी संचालक अजय उमाळकर, उपसभापती बबनराव तुपे, दुर्गाप्रसाद रहाटे, डॉ. सचिन जाधव, नगरसेवक रवी रहाटे, नितीन गारोळे, सह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी लाहोरकर, प्राचार्य गजानन निकस व सर्व कर्मचारी हजर होते. संचालन उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया यांनी तर आभार नगरसेवक विकास जोशी यांनी मानले.

मंत्री महोदयांनी केले कौतुक

राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे व गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी काल 1 मे रोजी या कोविड केअर सेंटरला भेट देऊन शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचे कौतुक केले. असाच उपक्रम प्रत्येक लोकप्रतिनिधींनी राबविल्यास शासनावरचा ताण कमी होऊन रुग्णांना मदत होईल असे मत दोन्ही मंत्री महोदयांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या