कोहलीला आयडॉल मानतोस, मग त्याच्यासारखा खेळ ना! शोएब अख्तरने सुनावले

shoaib-akhtar-slams-babar-azam-says-when-virat-kohli-your-idol-you-should-also-learn-play-him

सामना ऑनलाईन । लंडन

हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहलीला आपला आयडॉल मानतोस आणि त्याच्यासारखे यश मिळावे असे तुला वाटते ना. मग कठीण परिस्थितीत मोठी खेळी कशी करावी? आणि संघाला यश कसे मिळवून द्यावे? हे विराटकडून शिक आणि संघाच्या यशासाठी तसे खेळ ना! असे खडे बोल पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकचा धडाकेबाज फलंदाज बाबर आझम याला सुनावले आहेत.

‘रावळपिंडी एक्सप्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱया शोएब अख्तरने बाबर आझमच्या क्षमतेचे कौतुक केले. तो म्हणाला, बाबरच्या क्षमतेबद्दल मला शंका नाही, पण आता त्याने संघासाठी आपला खेळ उंचावायला हवाय. तो जर कोहली, रोहित शर्मा आणि विलियम्सन यांना प्रेरणास्थानी मानत असेल तर त्याने या सर्व फलंदाजांचे गुण आत्मसात करायला हवे. हे तिन्ही फलंदाज त्यांचा संघ कठीण परिस्थितीत असताना अर्धशतक गाठल्यावर मोठी खेळी साकारून संघाला कसा विजय मिळवून देतात, याचे धडे बाबरने घ्यावेत. त्याच्या भवितव्यासाठी ते फार लाभदायक ठरेल,असेही अख्तर म्हणाला.