Photo – ‘शोले’तील सांबाच्या मुली अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीत; एक हॉलिवूड, तर दुसरी बॉलिवूडमध्ये सक्रिय

हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास रचणाऱ्या ‘शोले’ चित्रपटातील प्रत्येक संवाद हिट ठरले. यातील ‘अरे ओ सांबा, कितने आदमी थे?’, हा गब्बर सिंह आणि सांबातील संवाद आजही प्रेक्षकांचा तोंडपाठ आहे. यात सांबाची भूमिका मॅक मोहन यांनी साकारली होती. मॅक मोहन यांनी मिन्नीसोबत लग्न केले आणि दोघांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.

manjari-makijany-vinati

सांबाच्या दोन्ही मुलींची मंजरी मकिजानी आणि विनती मकिजानी अशी नावे आहेत. तर मुलाचे नाव विक्रांत आहे. सांबाच्या या दोन्ही मुली अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीत.

manjari-makijany-vinati-mak

सांबाची मोठी मुलगी मंजरी मकिजानी ही एक चित्रपट निर्माता असून लघुपट बनवण्यात तिचा हातखंडा आहे. 2012 मध्ये आलेल्या ‘द लास्ट मार्बल’ आणि 2014 मध्ये आलेल्या ‘द कॉर्नर टेबल’ हे तिचे लघुपट चांगलेच गांजले होते.

manjari

मंजरी हिने हॉलिवूडच्या ‘डर्किक’, ‘द डार्क नाईट रायसेस’, ‘वंडर वुमन’ आणि ‘मिशन इम्पॉसिबल’ यासारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. बॉलिवूडमध्ये ‘सात खून माफ’ आणि ‘वेक अप सिड’ यासारख्या चित्रपटांसाठीही तिने काम केले आहे. हॉलिवूडमध्ये सक्रिय असलेली मंजरी हिने इमॅन्यूअल पापास (Emmanuel Pappas) सोबत लग्न केले असून ती अमेरिकेतच राहते.

manjari-makijany

सांबाची दुसरी मुलगी विनती मकिजानी ही निर्माता आणि अभिनेत्री आहे. ‘माय नेम इज खान’, ‘स्केट बस्ती’ आणि ‘स्केटर गर्ल’ या चित्रपटांद्वारे तिला विशेष ओळख मिळाली. तसेच विनती ‘द मॅक स्टेज’ या कंपनीची संस्थापकही आहे.

manjari1

आपली प्रतिक्रिया द्या