जर्मनीमध्ये दोन बारवर गोळीबार, आठ जणांचा मृत्यू, हल्लेखोर फरार

484

जर्मनीमधील फ्रँकफर्टजवळील हनाऊ शहरात दोन बारवर बुधवारी रात्री उशिरा गोळीबार झाला. एका कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जर्मनीच्या सुरक्षा विशेष दलातील जवानांनी हल्लेखोरांच्या कारचा पाठलाग केला. मात्र हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले.

फ्रँकफर्टजवळच्या हनाऊ शहरत बुधवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. विशेष म्हणजे यावेळी दोन बार हल्लेखोरांच्या निशाण्यावर होते. हनाऊ शहरातील ‘शिशा बार’मध्ये दोन वेळा गोळीबार करण्यात आला. तर ‘मिडनाइट’ बारमध्ये एकदा गोळीबार झाला. यामध्ये एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून ते एका कारमधून आले होते. त्यांची संख्याही जास्त होती. त्यांचा पाठलाग करण्यात आला मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. असे असले तरी ते लवकरच पकडले जातील असा विश्वास जर्मन पोलिसांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या