जीतू राय ठरला ‘गोल्डन बॉय’

32

नवी दिल्ली – येथील डॉ. कर्णीसिंह शूटिंग रेंजवर रंगलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजीत लष्कराच्या जीतू रायने ५० मीटर पिस्तोल गटात २३०.१ गुण या विश्वविक्रमी कामगिरीसह सुवर्णपदक पटकावले. यंदाच्या विश्वचषकातला पहिला हिंदुस्थानी ‘गोल्डन बॉय’ ठरण्याचा बहुमान जीतूने पटकावला. रिओ ऑलिम्पिकनंतरचे जीतूचे हे चौथे आंतरराष्ट्रीय पदक आहे.

यंदा विश्वचषक नेमबाजीत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात कास्य पदकाची कमाई करणाऱया २९ वर्षीय जीतूची ५० मीटरमधील सुरुवात अडखळती झाली, पण प्रत्येक शॉटवर कामगिरी उंचावत अंतिम फेरीत त्याने ५० मीटर पिस्तोलच्या सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. याच प्रकारात हिंदुस्थानच्या अमनप्रीतने २२६.९ गुणांसह रौप्यपदक पटकावले. इराणच्या वाहिद गोलखंदनला २०८ गुणांसह तिसऱया स्थानावर समाधान मानावे लागले.

‘घरच्या प्रेक्षकांसमोर विश्वचषकाचे सुवर्णपदक पटकावण्याचा आनंद काही औरच आहे. आता म्युनिच (जर्मनी) विश्वचषक नेमबाजीतील चमकदार कामगिरीसाठी मी सज्ज होतोय.  – जीतू राय

आपली प्रतिक्रिया द्या