दुकाने, हॉटेल्स, केमिस्ट रात्रभर सुरू ठेवा,  काँग्रेसची आयुक्तांकडे मागणी

678

न्यूयॉर्कच्या धर्तीवर मुंबईतही दुकाने, हॉटेल्स, केमिस्टसह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने रात्रीदेखील सुरू ठेवावीत अशी मागणी काँग्रेसने आयुक्तांकडे केली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेस नगरसेवकांसह बुधवारी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना निवेदन दिले.

मुंबईतील विविध विकासकामांबाबत आज काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली.  यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असलेल्या मुंबईत विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू रात्रीच्या वेळीही उपलब्ध व्हाव्यात यासाठी ही दुकाने रात्रीदेखील सुरू ठेवावीत अशी मागणी करण्यात आली. यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना कराव्यात असेही स्पष्ट करण्यात आले. काँग्रेसने केलेल्या मागणीबाबत पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या