‘ते.. आपल्यातले’ सामाजिक अंतराची जाणीव करून देणारा लघुपट

772

सध्या सर्व जगातच कोविड 19 चे सावट पसरले आहे. कोविड 19 या विषाणूने तर संपूर्ण जगात जणू दहशतच पसरवली आहे. अशा या महामारीच्या आजाराला रोखण्यासाठी शासनाकडून वारंवार करण्यात येणारी घोषणा म्हणजे सामाजिक अंतर(social distance). एका विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, हा विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी या सामाजिक अंतराचा वापर करणे योग्य समजले जात आहे. पण… हे सामाजिक अंतर तर आपण गेली कित्येक वर्षे अगदी जबाबदारीने चोखपणे पार पाडत आलोय. ते म्हणजे तृतीयपंथी समाजासोबत. आज गेली कित्येक वर्षे हा समाज आपल्या सोबत आपल्यातला म्हणून राहत आहे पण आपण प्रत्येकाने त्यांच्यासह ठेवला तो संबंध म्हणजे केवळ सामाजिक अंतर.

एका विषाणूला रोखण्यासाठी सामाजिक अंतर आपण पाळतोय खरं पण या तृतीयपंथी समाजातील प्रत्येक जण तर आपल्यातलाच एक आहे याची समज आपल्यात कुठेतरी कमी जाणवतेय. आपल्यातला त्यांच्या बद्दलचा हा समज कुठेतरी नक्की कमी व्हायला हवा किंवा दूर व्हायला हवा म्हणून “ते” आपल्यातले’ हा विषय घेऊन दिग्दर्शक आणि लेखक प्रविण कमळे या लघुपटाचा भाग बनत प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. विघ्नेश जयस्वाल निर्मित Take Memories Production अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या