बीडमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण

71

सामना प्रतिनिधी । बीड

बीडमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास तालुक्यातील काही भागामध्ये तुरळक पाऊस पडला.घाटसावळी आणि ढेकनमोहा गावामध्ये शॉवर सारखा पाऊस पडत आहे. या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले नाही, मात्र गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या आठवणीने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने उत्तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भात गारपीटीसह मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवता होता.

याआधी मराठवाडा आणि विदर्भामध्ये १०, ११ फेब्रुवारीला झालेल्या गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. हाताला आलेली पिकं डोळ्यासमोर भूईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११ जिल्ह्यातील सुमारे ५० तालुक्यांमधील १०८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यामध्ये यामध्ये प्रामुख्याने गहु, हरभरा, ज्वारी व रब्बी हंगामामधील फळ पिकांचा समावेश होता.

आपली प्रतिक्रिया द्या