कौन है? मध्ये राजकुमार आणि श्रद्धा

24

सामना ऑनलाईन । मुंबई

कलर्स वाहिनीवरील कौन है? या हॉरर मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या मालिकेच्या आगामी भागात मधुरा नाईक झळकणार असून तिच्यासोबत आगामी स्त्री या चित्रपटाते कलाकार राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरही दिसणार आहेत. आगामी भागातील कथा ही के.के.स्टुडीओभोवती फिरते. प्रत्येक अमावस्येच्या रात्री कलाकार आणि कर्मचाऱयांना सुट्टी दिली जाते कारण स्टुडीओमधील दुष्टशक्तींनी त्यांच्यावर हल्ला करू नये. पण एका चित्रपटाच्या टीमने सुट्टीची प्रथा मोडण्याचे ठरविले. आणि चित्रीकरणाला सुरुवात झाली. मात्र याविषयीची माहिती नसलेली अभिनेत्री नंदिनी या वाईट आत्म्याच्या तावडीत सापडते व स्टुडीओच्या आत जमिनीखाली अडकून बसते. नंदिनी या स्टुडीओमधून जिवंत बाहेर पडते का हे पाहण्यासाठी प्रत्येक शुक्रवार ते रविवार रात्री 10.30 वाजता कलर्सवर नक्की पहा कौन है?

आपली प्रतिक्रिया द्या