श्रद्धा कपूरने आठवडाभर आधीच साजरे केले रक्षाबंधन

15

सामना ऑनलाईन । मुंबई

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनच्या ‘द ड्रामा कंपनी’ कार्यक्रमात आगामी चित्रपट हसीना पारकरचे कलाकार आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. या चित्रपटात श्रद्धा कपूर प्रथमच आपला भाऊ सिद्धान्त कपूर याच्यासोबत दिसणार आहे. तिने या कार्यक्रमाच्या सेटवर एक आठवडा आधीच राखी पौर्णिमा साजरी केली.

हसीना पारकर आणि तिचा भाऊ, कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांच्या भूमिका साकारणाऱ्या दोघांनी ‘द ड्रामा कंपनी’च्या सेटवर कलाकारांसोबत धमालही केली. यावेळी आणखी एक धक्का देत श्रद्धाने त्या मंचावर कृष्णा अभिषेक आणि सुदेश लाहिडी यांना देखील राखी बांधली. ‘द ड्रामा कंपनी’चा हा भाग येत्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या