Video : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री

2156
actress-love-street-dog

सामना ऑनलाईन । मुंबई

रस्त्यावरचे प्राणी विशेषत: कुत्रे हा नेहमीच चर्चेत राहिलेला विषय आहे. अनेक प्राणी प्रेमी त्यांची काळजी घेत असतात. त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून संस्थांचे ही प्रयत्न सुरू असतात. हायप्रोईल समजला जाणारा वर्ग देखील अशा ठिकाणी पाहायला मिळतो. सेलिब्रिटी जगतात देखील काही जण यासाठी काम करतात. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा असाच एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये ती सेटवर असताना रस्त्यावरचे कुत्रे जवळ आल्यानंतर त्यांना न झिडकारता बिस्किटे देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

श्रद्धा कपूर ही सध्या साहोच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. कपिल शर्माच्या सेटवर प्रमोशनसाठी पोहोचली असताना अचानक रस्त्यावरचे काही कुत्रे तिच्या आजूबाजूला घुटमळायला लागले. तेव्हा तिने त्यांना दूर न करता बिस्कीट दिले. तिच्या या प्राणीप्रेमामुळे तिचे चाहते खूश झाले. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या