I Am In Love …श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली? पार्टनरसोबतचा फोटो केला शेअर

कित्येक तरुणांची क्रश आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या चर्चेत आहे. श्रद्धाने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत अनेक चांगल्या चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे ती नेहमीच चर्चेचा विषय असते. मात्र, आता श्रद्धा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. श्रद्धा कपूर आणि तिचा मित्र राहुल मोदी हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता या अफवांना स्वत: श्रद्धानेच पूर्णविराम दिला आहे. श्रद्धाने आपल्या रिलेशनशीपची कबुली दिली आहे.

श्रद्धा कपूरने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ‘तू झूठी मैं मक्कार’चा लेखक राहुल सोबतचा हा एक फोटो आहे. या फोटोवर तिने कॅप्शन देत लिहिले की, ‘माझं हृदय तू ठेव पण, माझी झोप मला दे यार…” या कॅप्शनसह तिने काही इमोजीदेखील पोस्ट केले आहेत. सोबतच स्टोरीवर तिने राहुललादेखील टॅग केले आहे. या सेल्फीमुळे श्रद्धाचे राहुल मोदीसोबतचे नाते पक्के असल्याच्या चर्चा सध्या नेटकरी करत आहेत.

Shraddha Kapoor ने राहुल मोदी मोदी संग रिलेशनशिप किया कंफर्म! तस्वीर शेयर कर लिखा- 'दिल रख ले...

‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटाचे लेखन राहुल मोदी याने केले होते. या चित्रपटात श्रद्धा प्रमुख भूमिकेत दिसली. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्यातील मैत्री वाढत गेली. यानंतर ते अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. या वर्षी मार्चमध्ये एका मित्राच्या लग्नातही दोघे गेले होते. श्रद्धा कपूरने आपल्या व्हेकेशनचे फोटो शेअर केले होते. मात्र, त्यांनी कधीच त्यांच्या रिलेशनबाबत उघडपणे कोणतेही वक्यव्य केले नाही. आता त्यांच्या फोटोमुळे चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

श्रद्धा कपूर राहुलआधी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत रिलेशनमध्ये होती. चार वर्षांच्या रिलेशननंतर त्यांच्या रिलेशनला फूलस्टॉप लागला.