श्रावणातील पहिल्या शनिवारी शनिशिंगणापुरात उसळली भाविकांची गर्दी

श्रावणमासच्या पहिल्या शनिवारी शनिशिंगणापुरात हजारो भाविकांनी शनी दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे शनी चौथर्‍यावर जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची ओल्या वस्त्ररात गर्दी झाली. श्रावण महिन्यात शनी चौथरा दोन तास खुला ठेवल्याने दर्शनासाठी भाविकांची अक्षरशः झुंबड उडाली.

दोन दिवसापासून श्रावण महिना प्रारंभ झाला आहे. आज पहिलाच श्रावणी शनिवार असल्याने पहाटे महाआरती संपल्यानंतर शनी चौथरा भाविकांसाठी खुला होताच शेकडो भाविक चौथरावर जलाभिषेक करण्यासाठी दाखल झाले. पहाटेचा मंगलमय सोहळा व भाविकांची गर्दीने शनिदेवाचा नामघोष दुमदुमला.

पहाटे पाच ते सात या वेळेत शनिदेवाला स्नान घालण्यासाठी परिसरातील राज्यभरातील भाविकाना शनी मूर्तीला थेट स्पर्श करून जलाभिषेक करण्याचे भाग्य भाविकांना मिळाले. यावेळी दर्शनासाठी भाविकांची अक्षरशः झुंबड उडाली.

शनिशिंगणापूरात आज पहाटेपासून हजारो भाविक पायी येऊन दर्शनाचा लाभ घेत होते. दिवसभरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली मंदिर परिसरातील वाहन तळ पूर्ण भरून गेले महाद्वार पासून ते थेट शनी चौथर्‍यापर्यंत भाविकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या. अभिषेक भवनात मंत्र पठणनासाठी व पूजा पाठ साठी अनेक भाविकांनी पुरोहितांच्या हस्ते विधीवत पूजा केल्या. यावेळी हजारो लिटर तेल शनी मूर्तीला अर्पण केले.

परिसरातील गावच्या भाविकांनी येथे आलेल्या भाविकांना भंडारा अन्नदान मोठ्या प्रमाणात केले. दिवसभर भाविकांची गर्दी टिकून राहिल्याने जवळपास पहिल्याच शनिवारी एक लाखाहून अधिक भाविकांनी शनिमहाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला.