घरच्या मास्टर शेफला मिळतेय अनोखी संधी, आता दहिसर, विलेपार्ले, बदलापूर आणि दादर केंद्रांवर प्राथमिक फेरी

295

ऑगस्टपासून सुरू झालेली ‘श्रावण महोत्सव 2019’ या भव्य पाककला स्पर्धेची प्राथमिक फेरी अंतिम टप्प्यावर आली आहे. आतापर्यंत हजारो गृहिणींनी स्पर्धेत भाग घेतला आहे. ठाणे, ताडदेव, डोंबिवली, गोरेगाव, वसई, खारघर आणि चेंबूरच्या उत्तम प्रतिसादानंतर आता दहिसर, विलेपार्ले, बदलापूर आणि दादर या केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे. केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांनाही स्पर्धेत पाककौशल्य दाखवण्याची संधी मिळत आहे. दैनिक ‘सामना’ या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहे.

उत्तरा मोने यांच्या मिती क्रिएशनतर्फे ‘श्रावण महोत्सव 2019’ ही स्पर्धा घेण्यात येत आहे. सामान्य गृहिणींमधील पाककौशल्याला हक्काचे व्यासपीठ मिळावे हे स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. विविध प्रकारचे पराठे किंवा थेपले (गोड किंवा तिखट) हा स्पर्धेचा विषय आहे.  प्राथमिक फेरीचे मुख्य परीक्षक शेफ तुषार प्रीती देशमुख आणि न्यूट्रीशनिस्ट नमिता नानल आहेत. 17 ऑगस्ट रोजी दहिसर येथील प्राथमिक फेरी माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सहकार्याने होणार आहे. 18 ऑगस्ट रोजी विलेपार्ले येथे होणारी फेरी शुभदा पाटकर आणि शशिकांत पाटकर यांच्या सहकार्याने होईल. 20 ऑगस्ट रोजी बदलापूर येथे नगरसेवक संभाजी शिंदे यांच्या तर 21 ऑगस्ट रोजी होणारी दादर येथील स्पर्धा वनिता समाज यांच्या सहकार्याने होणार आहे.

माध्यम प्रायोजक

तारीख/वेळ        शहर                     संपर्क क्रमांक पत्ता

17 ऑगस्ट  दहिसर   तेजस्वी घोसाळकर 9730640127   विद्यामंदिर शाळा,

2 वाजता                नयन वालावलकर 9819146354    आनंद नगर, दहिसर (पू.).

18 ऑगस्ट  विलेपार्ले अंकुश कदम 9702351827  लोकमान्य सेवा संघ,

4 वाजता                हर्षाली बेलवलकर 9769600817    राम मंदिर रोड,  विलेपार्ले (पूर्व).

20 ऑगस्ट  बदलापूर संभाजी शिंदे                  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हॉल,

11.30 वा.              9881070303               कात्रप, बदलापूर (पूर्व).

21 ऑगस्ट  दादर      ज्योती भोसले 9869958432         वनिता समाज हॉल,

3 वाजता                मिती ग्रुप 9930115759     शिवाजी पार्क, दादर (प.).

आपली प्रतिक्रिया द्या