छिंदमची खुर्ची युवासैनिकांनी फेकली बाहेर

27

सामना प्रतिनिधी । नगर

शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या दालनातील खुर्ची युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी लाथा मारून बाहेर फेकून दिली.

नवनिर्वाचित उपमहापौर शिवसेनेचे अनिल बोरुडे यांनी आज पदभार स्वीकारला. या दालनात असलेली छिंदमची खुर्ची युवासेनेचे जिल्हाधिकारी विक्रम राठोड, महिला आघाडी अध्यक्षा आशा निंबाळकर, नगरसेवक योगिराज गाडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱयांनी महापालिकेच्या आवारात आणली. त्यानंतर खुर्चीला लाथ मारून ती बाहेर फेकून देण्यात आली. या वेळी रावजी नांगरे यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या