श्रेया घोषालकडे गूड न्यूज, शेअर केला बेबी बम्पचा फोटो

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने आज चाहत्यांसोबत तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बातमी शेअर केली आहे. श्रेयाकडे गूड न्यूज असून ती लवकरच आई होणार आहे. श्रेयाने सोशल मीडियावर बेबी बम्पसोबत फोटो शेअर केला आहे.

‘बेबी #श्रेयादित्य लवकरच येतोय. मला व शिलादित्यला ही बातमी तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद होत आहे. आमच्या आयुष्यातील या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. त्यासाठी आम्हाला तुमच्या प्रेमाची व शुभेच्छांची गरज आहे’ असे ट्विट श्रेयाने केले आहे.

श्रेयाने 5 फेब्रुवारी 2015 रोजी तिचा बालपणीचा मित्र शिलादित्य याच्यासोबत लग्नगाठ बांधली. बंगाली पद्धतीने हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. शिलादित्य मुखोपाध्याय हा रॅसिलंट टेक्नोलॉजीज आणि hipcask.com या वेबसाईचा संस्थापक आहे

आपली प्रतिक्रिया द्या