ऋषभ पंतने संधी गमावली, ‘हा’ खेळाडू चौथ्या क्रमांकावर खेळणार

1363
rishabh-pant

टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 4 थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी युवा फलंदाज श्रेयस अय्यरचे समर्थन केले आहे. रवी शास्त्री यांनी इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत वन-डे साठी अय्यर चौथ्या क्रमांकावर पुढेही कायम खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘गेल्या दोन वर्षात आम्ही या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे, त्यातील सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा तरुण खेळाडूंना क्रिकेट संघात संधी देण्याचा होता. आताही आम्ही त्याच मुद्द्यावर ठाम आहोत’, असे शास्त्री म्हणाले.

नुकत्याच वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या तीन वन-डे सामन्यांपैकी दोन सामन्यांत अय्यर ने 71 आणि 65 धावा ठोकल्या. अय्यरच्या आधी ऋषभ पंत याला संधी देण्यात आली होती. मात्र तो संधीचा फायदा उचलत चांगला खेळ करून दाखवण्यास अपयशी ठरला. अखेर अय्यरने ही जागा पटकावली.

shreyas-iyer

आपली प्रतिक्रिया द्या