श्रेयस छोट्या पडद्यावर

17

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता श्रेयस तळपदे अनेक वर्षांनी छोटय़ा पडद्यावर येत आहे. झी युवावरील ‘गुलमोहर’ मालिकेच्या निमित्ताने श्रेयस हा अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले हिच्यासोबत प्रेक्षकांना वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेयस आणि गिरिजा हे दोघेही उत्तम कलाकार असून दोघांनीही अनेक मालिका आणि सिरीयलमध्ये काम केले आहे. मात्र दोघांनीही एकत्र काम केले नव्हते.

‘गुलमोहर’ ही छोटय़ा सुंदर हृदयस्पर्शी कथांवर आधारित मालिका आहे. ती २२ जानेवारीपासून सोमवार आणि मंगळवार रोज रात्री ९.३० वाजता झी युवावर पाहायला मिळेल. ‘स्माईल प्लीज’ ही मालिकेची पहिली कथा आहे. त्यामध्ये श्रेयस आपल्याला हसायचा कानमंत्र देणार आहे. या भागात उदय सबनीस आणि उदय टिकेकर यांच्याही भूमिका असून मंदार देवस्थळी यांचे दिग्दर्शन आहे.

आपली प्रतिक्रिया द्या