देवगडमध्ये ३ डिसेंबरला दत्त जन्मोत्सव सोहळा

91

सामना ऑनलाईन, देवगड

देवगड तालुक्यातील वाडा येथील पाटणकर दत्त मंदिरात बुधवार २९ नोव्हेंबर ते मंगळवार ५ डिसेंबर या कालावधीत दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. उत्सव कालावधीत दररोज सकाळी महापूजा, अभिषेक, भिक्षा, दुपारी महाप्रसाद तर रात्री ९ वा. आरती ,मंत्रपुष्प, ९.३० वा. श्रीकृष्णबुवा घाटे (पडेल) यांचे प्रवचन होईल. त्यानंतर १०.१५ ते १ या वेळेत ह.भ.प.मनोहरबुवा दिक्षित(औरंगाबाद)यांचे किर्तन होईल. त्यांना प्रकाश नातू (सांगली) हे संवादिनी तर रूपक वझे (विरार), डॉ. केदारनाथ मुठे (ठाणे) हे तबलासाथ करतील.

दरम्यान ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वा. ह.भ.प.भागोजी महाराज साळुंके(जुन्नर) यांचे वारकरी किर्तन होईल. रविवार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वा. श्री दत्त जन्मोत्सव सोहळा तर रात्री १० वा. स्वरनिनाद प्रस्तू स्वर कृष्णेच्या काठी हा सांगितीक कार्यक्रम सादर होईल. त्यात प्राजक्ता काकतर(डोंबिवली), अजिंक्य पोंक्षे(रत्नागिरी) यांचे गायन होईल. त्यांना मधुसूदन लेले (रत्नागिरी) हे संवादिनी, रूपक वझे (विरार) हे तबला तर राजा केळकर (रत्नागिरी)पखवाज साथ करतील. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन दत्तात्रय राम पाटणकर व परिवारातर्फे करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या