श्रीसिद्धिविनायक उपक्रम, तुमच्या सोसायटीतच करता येणार रक्तदान

909

कोरोनाच्या संकटात रक्त कमी पडू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी स्वतः पासून रक्तदानाला सुरुवात केली. तसेच सर्व ती खबरदारी घेत जनतेने ही पुढे यावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे राज्यातील इतर रुग्णांच्या उपचारांवर गंभीर होतायेत. इतर रुग्णांना सर्वाधिक गरज आहे ती रक्ताची. रक्ताची ही निकड लक्षात घेऊन अनेक ठिकाणी सुरक्षित रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आली आहेत. मुंबईत सिद्धीविनायक मंदिर न्यासाने आता रक्तदात्यांना थेट त्यांच्या सोसायटींमध्येच रक्तदानाची व्यवस्था केली आहे. रक्त संकलन करणारी अँम्बुलन्स आता रक्तदात्यांच्या घरी येणार आहे. आरोग्य संचालक डाॅ. साधना तायडे, डाॅ. थोरात, तसेच जे.जे.रक्तपेढीचे आरोग्य कर्मचारी, मंदिराच्या कार्यकारी अधिकारी प्रियांका छापवाले, उपकार्यकारी अभिनंदन मोरे उपस्थित होते. इतर रुग्णांच्या मदतीसाठी सर्वांनी अशा सुरक्षित रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचं आवाहान सिद्धीविनायक मंदिर न्यासाने केलं आहे. संपर्कासाठी [email protected] [email protected] इथे ईमेल करा.

आपली प्रतिक्रिया द्या