47 वर्षीय चामिंडा वासचा अफलातून फिटनेस

गोलंदाज चामिंडा वासची संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. आजच्या घडीला 47 वर्षे पूर्ण केलेल्या चामिंडाने युवा क्रिकेटर्सनाही चकित करणारा फिटनेस दाखवला आहे. त्याची ही अफलातून कामगिरी श्रीलंकेच्या युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायीच ठरणारी आहे. श्रीलंकेच्या या माजी तुफानी गोलंदाजाने 2 किमी अंतर 7 मिनिटे 30 सेकंदात पार करीत सर्वानाच तोंडात बोटे घालायला लावली. फिटनेस चाचणी पास करण्यासाठी श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंना हे अंतर 8 मिनिटे 35 सेकंदांत पार करायचे आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने या महिन्यापासून फिटनेससाठी नवा नियम लागू केला आहे. त्यासाठी लंकेच्या युवा क्रिकेटपटूंना 2 किमी अंतर निर्धारित वेळेत धावून पूर्ण करावे लागणार आहे. ही चाचणी कोलंबोच्या सुगाथादसा स्टेडियमवर पार पडणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या