अखनूरमध्ये जवानांनी उध्वस्त केली पाकिस्तानी चौकी

19

सामना ऑनलाईन। श्रीनगर

जम्मू-कश्मीरमधील पूंछ आणि अखनूर भागात रविवारी सकाळी पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी सीमा रेषा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. तर दुसरीकडे अखनूर सेक्टरमध्ये जवानांनी पाकिस्तानी चौकीच उडवून टाकली .

एएनआय या वृत्तसंस्थेने त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात एका चौकीवर पाकिस्तानी झेंडा फडकताना दिसत असून दुसऱ्याच क्षणी चौकीच्या ठिकऱ्या उडताना दिसत आहे.

दरम्यान, पूंछ येथील शाहपूर आणि केरनी भागात शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता सीमेपलिकडून पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरू केला होता. त्यास जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी उडालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या जवानाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गेल्या चार दिवसात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या