पुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती

40

सामना ऑनलाईन। श्रीनगर

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्हयातील अवंतीपोरा येथे दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी खळबळजनक माहिती पाकिस्तानने इस्लामाबाद येथील हिंदु्स्थानच्या उच्चायुक्तांना दिली आहे. कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा याच्या मृत्यूचा सूड म्हणून दहशतवाद्यांनी हल्ल्याची ही योजना आखल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. श्रीनगर येथे एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना ज्येष्ठ अधिकाऱ्याने याबदद्ल सांगितले आहे.

 पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याची सूचना दिल्यानंतर संपूर्ण कश्मीरमध्ये खळबळ उडाली आहे. दहशतवादी कोणत्याही वाहनावर आयईईडी स्फोटक लावून विस्फोट घडवू शकतात. अशी माहिती पाकिस्तान बरोबरच अमेरिकेने दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. कुख्यात दहशतवादी झाकीर मूसा याच्या मृत्यूचा सूड घेण्याची योजना दहशतवाद्यांनी आखल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. गेल्या महिन्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत जवानांनी झाकिर मूसाला कंठस्नान घातले होते.

दरम्यान , किर्गीस्तान येथील बिश्केक एससीओ समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनफिंग यांना सांगितले होते की ‘पाकिस्तानशी चर्चा करण्याआधी त्यांनी दहशतवादमुक्त वातावरण तयार करावयास हवे. कारण आतापर्यंत प्रत्येकवेळी पाकिस्तानबरोबर केलेली चर्चा निष्फळ ठरली आहे. असेही मोदींनी जिनफिंग यांच्याशी बोलताना म्हटले होते. तेव्हापासून पाकिस्तान अस्वस्थ आहे. आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानला हिंदुस्थानसमोर गुडघे टेकवण्याशिवाय  पर्यायच नाहीेये.

 

आपली प्रतिक्रिया द्या