शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमला एका गुन्ह्यात जामीन

1843

सामना ऑनलाईन । नगर

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम याच्या न्यायालयीन कोठडीत शुक्रवारी सकाळी वाढ करण्यात होती. मात्र स्वत: छिंदमने जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर निर्णय देताना त्याला एका गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. असं असलं तरी त्याची सुटका होणार नसल्यानं त्याला पुन्हा नाशिकच्या जेलमध्ये हलवण्यात आलं आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव श्रीपाद छिंदम याला नाशिक कारागृहात हलवण्यात आलं होतं. त्यानंतर आज त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. छिंदमची कोठडी १४ तारखेला संपत होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी न्यायालयात परवानगी मागून त्याला न्यायालयात हजर केलं. पोलिसांनी न्यायालयात पोलीस कोठडी मागितली, मात्र न्यायालयानं न्यायालयीन कोठडीत १० दिवसांची वाढ केली होती. त्यानंतर श्रीपाद छिंदम याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली. यावेळी श्रीपाद छिंदमने काही अटी मान्य केल्यानंतर त्याला फक्त एका गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला. पण त्याची सुटका झालेली नसून १९ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी कायम ठेवण्यात आलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या