छिंदमच्या न्यायालयीन कोठडीत १० दिवसांची वाढ

19
shripad-chhindam

सामना ऑनलाईन । नगर

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता १९ तारखेपर्यंत छिंदमचा मुक्काम कोठडीत असेल.

श्रीपाद छिंदम याला नाशिक कारागृहात हलवण्यात आलं होतं. आज त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. छिंदमची कोठडी १४ तारखेला संपत होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी न्यायालयात परवानगी मागून त्याला न्यायालयात हजर केलं. पोलिसांनी न्यायालयात पोलीस कोठडी मागितली, मात्र न्यायालयानं न्यायालयीन कोठडीत १० दिवसांची वाढ केली.

आपली प्रतिक्रिया द्या