शिवरायांचा अपमान करून छिंदमने आमचे नाक कापले!

71

सामना ऑनलाईन । नगर

नगरचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याने महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांबद्दल वापरलेल्या अपशब्दामुळे आम्हाला बोलायलाही नाक राहिले नाही अशा शब्दात भाजपचे नगर जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी छिंदम याच्या वक्तव्याचा निषेध केला. रविवारी झालेल्या पत्रकार परिषेदेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

छिंदम याने शिवरायांचा अपमान केला होता. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद सर्वत्र महाराष्ट्रात उमटले होते. अनेक ठिकाणी आंदोलनं करून भाजपचा निषेध करण्यात आला. छिंदमच्या शिवरायांबद्दलच्या वक्तव्यामुळे आमचे नाक राहिले नाही, असे बेरड यांनी म्हटले. छिंदम याच्या वक्तव्याबाबत पक्षश्रेष्ठींना माहिती देण्यात आली आणि याबद्दलची तीव्रता लक्षात आणून दिली. त्यानंतर छिंदम याचा राजीनामा घेण्यात आल्याचेही बेरड यांनी स्पष्ट केले आहे.

याआधी छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम याच्या न्यायालयीन कोठडीत शुक्रवारी सकाळी वाढ करण्यात होती. मात्र स्वत: छिंदमने जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर निर्णय देताना त्याला एका गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. असं असलं तरी त्याची सुटका होणार नसल्यानं त्याला पुन्हा नाशिकच्या जेलमध्ये हलवण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या