केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतली संस्कृत मधून शपथ

सामना प्रतिनिधी । पणजी

उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सोमवारी सतराव्या लोकसभेच्या पहिल्या दिवशी सदस्यत्वाची संस्कृतमधून शपथ घेतली. गोव्याची कोकणी भाषा असताना आयुषशी संबंधित संस्कृत भाषेतून शपथ घेतल्याने ती लक्षवेधी ठरली आहे.

लोकसभेचे हंगामी सभापती वीरेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सतराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनला सोमवारी सुरुवात झाली. त्यावेळी नव्या सदस्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी नाईक यांनी कोकणी ऐवजी संस्कृतमधून शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व सभागृहाने टाळ्या वाजून त्यांचे स्वागत केले. हंगामी सभापती वीरेंद्र कुमार यांनीही नाईक यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या