श्रीरामपुरात 46 किलो गांजा जप्त; एकाला अटक

श्रीरामपूर पोलिसांनी शहरात छापा टाकून बोलेरो वाहनासह 46 किलो गांजा जप्त केला. बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गणेश भास्कर सरोदे (वय 38, रा. देवकरवस्ती, श्रीरामपूर) यास अटक केली आहे.

शहरातील देवकरवस्ती येथे एक इसम गांजाविक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन छापा टाकला असता 4 लाख 60 हजार रुपये किमतीचा 46 किलो गांजा व 4 लाख रुपये किमतीची एक महिंद्रा बोलेरो पीकअप असा एकूण 8 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी गणेश भास्कर सरोदे याला अटक करून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी, नाईक करमल, पंकज गोसावी, राहुल नरवडे, किशोर जाधव, सुनील दिघे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या