गौतम हिरण यांची सुपारी देऊन हत्या करणाऱ्या दोघांना अटक, पोलीस अधीक्षक मनोज पाटील

बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात दोघांना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सागर गंगावणे व बिट्टू रावजी वायकर (रा. श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या दोघांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात साधारण 40 जणांची चौकशी करण्यात आली. या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होणार आहे. हिरण यांच्या डोक्यात जोरात मार लागल्याने त्यांघा मृत्यु झाला आहे असा अहवाल वैद्यकीय अधिकारी यांनी दिला आहे.

1 मार्च रोजी हिरण बेलापूरातुन अचानक बेपत्ता झाले. त्यांचे अपहरण झाल्याचे भाऊ पंकज हिरण यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केला, पण तपास केला नाही. सहा दिवस झाले तरी पोलिसांना हिरण यांचा ठावठिकाणा लागेना. या मागणीसाठी श्रीरामपूरकरांनी एक दिवस बंद पाळला.

बेलापूर गावातील नागरिकांनी तीन दिवस गाव बंद ठेवून हिरण यांचा शोध त्वरित लावावा, आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली होती. माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. याचे पडसाद जिल्ह्यात उमटले, विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी तपासाची चक्रे फिरवली. सातव्या दिवशी वाकडी शिवारात कुजलेल्या अवस्थेत हिरण यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी चाळीस जणांनी चौकशी केली असून त्यातमध्ये महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या