दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड: श्रीरामपूर शहर पोलिसांचे यश

64

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडण्यात शहर पोलिसांना यश आले. पेट्रोलिंग करत असतांना नेवासा रस्त्यावरील अशोकनगर फाट्यावर रात्री साडे बारा वाजता तीन दुचाकीस्वार अंधारात लपून बसल्याचे पोलिसांना दिसले. त्यांना पोलिसांनी हटकले असता अंधाराचा फायदा घेऊन तिघे फरार झाले तर पाच जणांना पोलिसांनी पकडले.

पोलिसांनी त्यांच्याकडून दोन पल्सर दुचाकी, दोन तलवारी, मिरची पावडर, लोखंडी कटावणी, असा १ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सुनिल उर्फ छगन देवराम पवार (रा. अशोकनगर, मुळगाव परतूर, जिल्हा जालना), गोविंद लहू काळे (रा.ज्ञानेश्वरनगर,परतूर), राहुल उर्फ विकास गोदाजी चव्हाण (जोशी वस्ती अशोकनगर ), प्रदीप दादाहारी काळे (रा. वादाला महादेव ), राहुल भय्या अशोक जाधव (रा.निपाणी वडगाव), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून खनप्या उर्फ विनोद चव्हाण (रा अशोकनगर ), पपल्या उर्फ प्रफुल्ल जाधव (रा.निपाणी वडगाव ), विष्णू उर्फ भिन्ग्या गवारे (रा.अशोकनगर) हे तिघे फरार आहेत. या आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला असून गंठण चोरी, घरफोड्या करणारे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी गुन्हे केलेले आहेत, असे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या