श्रीरंग कॉलेजमध्ये रंगणार रंगीबेरंगी ‘सारंग’

ठाण्यातील श्रीरंग एज्युकेशन सोसायटीचे श्रीरंग विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजचा ‘सारंग-२०१७’ फेस्टिवल साजरा होत आहे. या फेस्टिवलमध्ये गायन, नृत्य, पेटिंग अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला...

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाण्यातील श्रीरंग एज्युकेशन सोसायटीचे श्रीरंग विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजचा ‘सारंग-२०१७’ फेस्टिवल ११ आणि १२ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. ‘दैनिक सामना’ या फेस्टिवलचे मीडिया पार्टनर आहे. या फेस्टिवलमध्ये ६२ शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे २८०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. गायन, वादन, नृत्य, कार्टून पेटिंग, मेहेंदी आर्ट, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट, टी-शर्ट पेंटिंग असे तब्बल २१ इव्हेंट या दोन दिवसांत होणार आहेत. या इव्हेंटचे अपडेट आपल्याला सामनाची वेबआवृत्ती saamana.com तसेच www.facebook.com/saamanaonline/ या फेसबूक पेजवरूनही पाहायला मिळतील.

आपली प्रतिक्रिया द्या