जपानी करतात मृत्यूची तयारी

30

सामना ऑनलाईन, टोकियो

जपानी  लोकांच्या ‘शुकात्सु’ उत्सवाबद्दल ऐकाल तर धक्का बसल्याशिवाय राहाणार नाही. सोहळ्याची वा उत्सवाची तयारी सर्वच करतात, पण मृत्यूची तयारी कधी ऐकलेय का! शुकात्सु म्हणजेच मृत्यूची तयारी. मृत्यूसाठी तयार राहणे. टोकियोमध्ये हा उत्सवच साजरा होतो. म्हणजे लोक एकत्र येऊन कपडय़ांपासून शवपेटीपर्यंतची तयारी करून ठेवतात. मृत्यूचे नाव उच्चारले तरी भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो. पण तो एक सोहळा समजून त्याची तयारी करायची, हा अजब प्रकार जपानी लोकांमध्ये बघायला मिळतो. यातून मृत्यूला हसतहसत सामोरे जाण्याचा दृष्टिकोन मिळतो. मृत्यू अटळ आहे, मग त्याचे हसून स्वागत करायला काय हरकत आहे, हे जपानी दाखवून देतात.

आपली प्रतिक्रिया द्या