राहू-शुक्र युती करणार होळीचा बेरंग, ‘या’ राशींसाठींची डोकेदुखी वाढणार

6 मार्च रोजी शिमगा असून 7 मार्च रोजी धुळवड साजरी केली जाणार आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्याने यंदाच्या वर्षी होळी अत्यंत धूमधडाक्यात साजरी केली जाणार आहे. एकमेकांना रंगाने माखवत धुळवड साजरी केली जाते. हिंदू संस्कृतीमध्ये सणांना फार मोठे महत्त्व आहे. होळी ही संपूर्ण देशभरात साजरी केली जाते आणि यामध्ये हिंदुस्थानातील नागरीक धर्म,पंथ, जात विसरून सामील होत असतात. मात्र होळीनंतर शुक्र आणि राहूची होणारी युती ही काही जणांसाठी चिंता वाढवणारी ठरणारी आहे. होळीच्या अवघ्या 4 दिवसांनंतर म्हणजेच 12 मार्च रोजी राहू आणि शुक्राची युती होणार आहे. शुक्र ग्रह हा भौतुक सुख, कला आणि सौंदर्याचा ग्रह मानला जाातो. शुक्र ग्रह तसे पाहिल्यास जीवनात चांगल्या गोष्टी आणणारा मानला जातो. मात्र राहू किंवा केतूसोबतची त्याची युती ही काहींसाठी चिंता वाढवणारी असते. या दोन्ही ग्रहांची युती 6 एप्रिल 2023 पर्यंत राहणार आहे,

मेष – मेष राशीच्या लोकांसाठी या युतीचा काय परीणाम होणार आहे ते पाहूया. या युतीमुळे तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीच्या जवळ याल ज्याचा सहवास तुमच्यासाठी चांगला नसेल. नात्यामध्ये तुमचा अपेक्षाभंग होऊ शकतो. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही तुम्ही गोंधळात पडू शकता आणि वैवाहीक आयुष्यात गोडवा टीकवून ठेवण्यासाठी तुम्हाला बरेच कष्ट करावे लागतील.

वृषभ – राहू-शुक्र युतीमुळे वृषभ राशीच्या लोकांना नातेसंबंधात अधिक काळजी घ्यावी लागेल व नवीन नातेसंबंधांबाबत सावधगिरीने पुढे जावे लागेल. काही जुन्या नातेसंबंधामुळे अडचणी येऊ शकतात. प्रेम जीवनात काळजीपूर्वक विचार करूनच निर्णय घ्या. या काळात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावरही नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या बोलण्याने इतरांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घेऊन संवाद साधा.

कन्या – राहू आणि शुक्राच्या संयोगामुळे कन्या राशीच्या लोकांच्या चिंता वाढू शकतात. तुम्ही कडवटपणे बोलू शकता, ज्यामुळे समोरचा दुखावला जाण्याची शक्यता आहे. तुमच्या वागण्याने लोक नाराज होऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. जोडीदाराला महत्त्व द्या आणि त्याच्याशी चांगले वागा.

मीन – शुक्र आणि राहूच्या संयोगामुळे मीन राशीच्या मंडळींची डोकेदुखी वाढणार आहे. वैवाहीक आयुष्याबाबत काळजी घ्या. या काळात तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा मिळणार नाही आणि नवरा-बायकोत भांडणे होण्याची शक्यता आहे. गृहकलह वाढण्याचीही भीती आहे. .

उपाय काय करावेत?

  • शुक्र आणि राहूचा संयोगामुळे जास्त त्रास होतं असेल तर, रोज सकाळी ओम शुं शुक्राय नमः हा जप करावा
  • शुक्रवारी नियमित उपवास करावा
  • शुक्रवारी जेवणात दही किंवा खीर सारख्या गोष्टींचा वापर करा
  • शुक्रवारी पांढरे कपडे घाला
  • ज्योतिषाचा सल्ला घेतल्यानंतरच हिरा किंवा ओपल, शुक्राचे रत्न घाला
  • राहूच्या वक्रदृष्टीची तीव्रता कमी व्हावी यासाठी पक्ष्यांना सात वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांचे मिश्रण खायला घाला
  • गरजूंना अन्नदान करा