Photo – लेहेंगा चोली घालून पलक तिवारीच्या घायाळ करणाऱ्या अदा, पाहा फोटो

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सिनेमात पदार्पण करण्याआधीच लाईमलाईटमध्ये चर्चेत असते. तिच्या स्टायलिश लूकसाठी ती प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे हिंदुस्थानी पोशाख असो किंवा वेस्टर्न दोन्ही पोशाखात ती सुंदर दिसते. पलकने नुकतेच इंस्टाग्रामवर लेहेंगा चोली घालून किलर फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लेटेस्ट फोटोशूटमध्ये पलकने पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या कॉम्बीनेशनमध्ये लेहेंगा चोली घातली आहे. तिचा पूर्ण लेहेंगा पिवळ्या रंगाचा असून त्याला गुलाबी रंगाचा टच दिला आहे. ब्रालेट रिव्हिलिंग चोली घालून पलकने कॅमेऱ्यासमोर किलर पोज दिल्या आहेत. यावर तिने सोनेरी आणि गुलाबी रंगाचे झुमके घातले आहेत.