अभिनेत्री श्वेता तिवारीवर फसवणूकीचा आरोप, कर्मचाऱ्याने पाठवली कायदेशीर नोटीस

अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यावरून बरीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिच्या पतीने श्वेता तिवारीला मानहानीची कायदेशीर नोटीस पाठविली होती. तर आता तिच्या अभिनय शाळेतील एका माजी कर्मचारी राजेश पांडे याने तिच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तसेच तिला कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

काय आहे प्रकरण?

श्वेता तिवारी हिने मुंबईत आपली अभिनय शाळा सुरु केली आहे. ज्याचं नाव ‘Shweta Tiwari’s Creative School of Acting’, आहे. यात राजेश पांडे हा शिक्षक होता. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी बोलताना पांडे याने सांगितलं की, ‘मी श्वेता तिवारी हिच्या अभिनय शाळेत 2012 पासून शिकवत होतो. तिने माझा डिसेंबर 2018 चा पगार दिला नाही आणि कधी माझ्या TDS चे पैसे देखील जमा केले नाही. मी श्वेता तिवारी हिच्या शाळेत इतकी वर्ष काम करूनही माझा विश्वासघात करण्यात आला आहे.’

‘आज तक’शी बोलताना राजेश पांडे म्हणाला की, ‘मी खूप अस्वस्थ आहे, कारण श्वेता तिवारी माझे पैसे देणं तर दूर आता माझे फोन ही उचलत नाही आहे.’ दरम्यान राजेश पांडे याने केलेल्या आरोपाची सत्यता पडताळण्यासाठी आज तकने श्वेता तिवारी हिचा पती अभिनव कोहली याच्याशी संपर्क साधला असता त्याने राजेश पांडे याने दिलेली माहिती खरी असल्याचं सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या